शनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर “श्री कृष्णा न्यूज” यूट्यूब चॅनलचे उद्घाटन

मिरज | शनिवार, दि. 16 मे 2026शनी अमावस्येच्या पवित्र आणि विशेष योगावर सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या बातम्यांना न्याय देण्यासाठी “श्री कृष्णा न्यूज” या नव्या यूट्यूब न्यूज चॅनलचे शुभ उद्घाटन करण्यात आले.
या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक घडामोडी, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, शासकीय योजना, आरोग्य जनजागृती तसेच जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जाणार आहेत.
“श्री कृष्णा न्यूज” हे चॅनल समाजातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनून सत्य आणि सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय सुरू करणार असल्याचे मत संपादक प्रशांत पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सांगितले की,
“समाजातील चांगल्या कामांना प्रसिद्धी मिळावी, महिलांच्या आरोग्य व जनजागृतीच्या विषयांना प्राधान्य मिळावे आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे.”
या शुभारंभ प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
🎥 लवकरच “श्री कृष्णा न्यूज” वरून विशेष बातम्या, मुलाखती, सामाजिक उपक्रम आणि थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहेत.
━━━━━━━━━━━━━━━
🖋️ संपादक : प्रशांत पवार
📞 संपर्क : 9764394636

और पढ़ें