ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मिरज येथे आयोजित एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरात उपस्थित ज्येष्ठ नागरिक, संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच श्री कृष्णा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्राचे मालक श्री. प्रशांत पवार.
मिरज, प्रतिनिधी :
श्री कृष्णा सोशल फाउंडेशन संचलित श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मिरज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरामध्ये सुमारे ५० ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया सुलभ व जलद पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्री कृष्णा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्राचे मालक श्री. प्रशांत पवार हे स्वतः उपस्थित राहून शिबिराचे नियोजन, मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रियेवर देखरेख करत होते.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कृष्णा सोशल फाउंडेशन, श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्र व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मिरज येथे आयोजित एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरात उपस्थित ज्येष्ठ नागरिक, संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच श्री कृष्णा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्राचे मालक श्री. प्रशांत पवार.

मिरज, प्रतिनिधी :

श्री कृष्णा सोशल फाउंडेशन संचलित श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मिरज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरामध्ये सुमारे ५० ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया सुलभ व जलद पद्धतीने पूर्ण करण्यात आली.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्री कृष्णा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्राचे मालक श्री. प्रशांत पवार हे स्वतः उपस्थित राहून शिबिराचे नियोजन, मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रियेवर देखरेख करत होते.

उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कृष्णा सोशल फाउंडेशन, श्री कृष्णा इंटरप्राईजेस डिजिटल ऑनलाइन सेवा केंद्र व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.

और पढ़ें